छत्रपती संभाजीनगर येथे आझाद चौकात भीषण आग लागली. या आगीत फर्निचरची ८-१० दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना ही आग लागली आहे. या आगीत काही जण अडकल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या आगीमुळे परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. धुराच्या लाटांसह क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं. आज गुरुवार (२० मार्च) पहाटेच्या सुमारास ८ ते १० फर्निचरच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत काहीजण अडकल्याची भीती, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. फर्निचरच्या दुकानांना आग लागली असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामध्ये दुकानं जळून खाक झाली आहेत. एका दुकानात आग लागली आणि मग ती पसरत पसरत सर्व दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गेल्या तीन तासांपासून ही आग धुमसत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची भीषणता पाहता आसपासच्या रहिवाशांना येथून लांब जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.









