प्रशासनाच्या कारवाईत 100 ते 125 ब्रांस वाळू जप्त. एरंडोल तहसीलदार यांनी केली कारवाई.

प्रशासनाच्या कारवाईत 100 ते 125 ब्रांस वाळू जप्त.


जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उत्रान गावाच्या हद्दीत सर्रास 40 ते 50 ट्रॅक्टर आणि मशिनद्वारे वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे सगळ सुरू असल्याची चर्चा तालुक्यातब्रंगली आहे.

उत्रान गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू चा दिवसा उपसा सुरू आहे. 40 ते 50 ट्रॅक्टर, 6 क्रेन द्वारे रोज वाळू उपसा करून ख्वाजा मियां दर्गा जवळ तीन ठिकाणी जवळपास सव्वाशे ते दीडशे ब्रास वाळूचा साठा केलेला होता. या संदर्भात 112 नंबर वरून पोलिसांना माहिती दिली असता अखेर काही तासानंतर पोलीस , तहसील आणि महसूल प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे ब्रांच वाढू जप्त करण्यात आली असून नेमकी ही वाळू उपसा करणारे कोण यांचा तपास केला जात आहे. कारवाईला उशीर झाल्याने सर्व ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळून गेल्याने प्रशासनाच्या हाती फक्त रेतीचे ढिगारे लागले आहेत.

112 या नंबर वर अतिशय शीघ्र मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन द्वारे करण्यात येते. मात्र 112 नंबर वर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर देखील जवळपास दोन तासानंतर पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर अखेर ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून होणाऱ्या या विलंबावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उत्रान गावामध्ये रेती माफिया कोण? साठा केलेली वाळू कुणाची आहे याचा तपास आता पोलीस करीत आहे


दुसरीकडे रवंजे येथे देखील मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वाळूची तस्करी केली जात आहे. येथे देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने गिरणा नदीतून वाळूचा उपसा केला जात असून त्याचा अनेक ठिकाणी साठा केला जात आहे. या सर्व साठ्यांबद्दल पोलीस आणि तहसील प्रशासनला नेमकी माहिती कशी मिळत नाही किंवा प्रशासनाचाच आशीर्वादाने वाढून आपल्या काम करतात का असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रवंजें गावच्या हद्दीत देखील अनेक ठिकाणी रेतीचा साठा केला आहे, आणि मुद्दा रात्रीच्या अंधारात या रेतीची डंपर मार्फत वाहतूक करून प्रशासना चा महसूल बोलायला जात आहे. अनेक तक्रारीनंतर देखील प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

 

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.