नागपूर हिंसाचार प्रकरणातील ५१ पैकी २४ आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड; ‘तो’ संशय खरा ठरणार?

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात दोन गट भिडले. त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात दोन गट भिडले. त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यावेळी अनेक घरं, दुकानं, वाहनं लक्ष्य करण्यात आली. सोमवारी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या संशयाला बळ देणारी माहिती पोलीस तपासातून पुढ आली आहे.
हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या एफआयआरमध्ये ५१ जणांची नावं आहेत. त्यांचे पत्तेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे यातील जवळपास निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासीच नाहीत. सोमवारी रात्रीच्या सुमारास मध्य नागपुरात हिंसाचार उफाळला. या प्रकरणात पोलिसांच्या एफआयआरमध्ये ५१ जणांची नावं आहेत.

त्यातील २४ आरोपी बाहेरचे आहेत. त्यामुळे हे २४ जण हिंसाचारावेळी मध्य नागपुरात का आले होते, ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार उफाळला. त्याची झळ आसपासच्या भागालाही बसली. चिटणीस पार्कसह आसपासच्या परिसरात दगडफेक, जाळपोळ झाली. या प्रकरणातील एफआयआरमध्ये ५१ जणांची नावं आहेत. त्यातील २४ जण बाहेरच्या भागातून मध्य नागपुरात आले होते. कळनमा, पारडी, उमरेड रोड, यशोधरा नगर, वाठोडा, टेक नाका, जाफर नगर, तासबाग परिसरातून ते हिंसाचार घडला त्या भागांमध्ये आले होते.पोलिसांच्या एफआयआरमध्ये नावं असलेले २४ जण हिंसाचारग्रस्त भागापासून कित्येक किलोमीटर दूरवर राहतात. हे सगळे हिंसाचार घडवण्यासाठीच सोमवारी मध्य नागपुरात आले होते, त्याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. कळनमा, पारडी, उमरेड रोड, यशोधरा नगर, वाठोडा, टेक नाका, जाफर नगर, तासबाग हे सगळे भाग जिथे हिंसाचार उफाळला, त्या भागाच्या चारही बाजूंना आहेत. त्यामुळे मध्य नागपुरात हिंसा घडवण्यासाठी आसपासच्या भागातून माणसं बोलावण्यात होती का, हा प्रश्न कायम आहे.हिंसाचारग्रस्त भागाचे आमदार प्रवीण दटकेंनी या प्रकरणात गंभीर आरोप केलेले आहेत. हिंसाचार बाहेरच्या लोकांनी घडवल्याचा त्यांचा दावा आहे. पोलीस एफआयआरमधील आरोपींचे पत्ते पाहता, दटकेंचा आरोप खरा ठरताना दिसत आहे. सोमवारी एका धार्मिकस्थळाच्या आवारात प्रार्थनेवेळी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. त्यामुळे हिंसाचार ठरवून घडवण्यात आला का, अशी शंका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे मंत्री गोविंद शेंडे यांनी बोलून दाखवली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.