जळगावमध्ये DLCC आणि DLRC बैठक संपन्न; बँकिंग आणि वित्तीय समावेशनासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा.

जळगावमध्ये DLCC आणि DLRC बैठक संपन्न; बँकिंग आणि वित्तीय समावेशनासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा.जळगाव जिल्हा अग्रणी बँक, जळगाव यांच्या वतीने जिल्हा स्तरीय सल्लागार समिती (DLCC) आणि जिल्हा स्तरीय पुनरावलोकन समिती (DLRC) यांची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते तर बैठक संयोजन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (LDM) प्रणव कुमार झा यांनी केले. या बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी कर्ज ठेव गुणोत्तर (CD Ratio), किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत कर्ज वाटप, सूक्ष्म व लघु उद्योगांना (MSME) दिले जाणारे कर्ज, शैक्षणिक कर्जे आणि महामंडळांना दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या स्थितीची तपासणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्षेत्र कर्ज (PSL) आणि MSME क्षेत्रातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना बँकांना दिल्या. तसेच, आदिवासी भागात बँकिंग सेवा वाढवण्यावर विशेष लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. जामनेर येथे सुमारे 2000 फार्म पाँड (शेतीसाठी तलाव) प्रकल्प सुरू असून, त्यासाठी बँकांनी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि बँकांचे कर्ज पोर्टफोलिओही सुधारेल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM), NABARD अमित तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अंकित, जिल्हा उप वनसंरक्षक जमीर एम. शेख, प्रकल्प विकासक (DRDA) आर. एस. लोखंडे, RSETIचे संचालक सुमित कुमार झा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे मुख्य व्यवस्थापक अभिषेक नंदेश्वर उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान बँकांना CD Ratio सुधारण्यास, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज वितरीत करण्यास, MSME ला अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यास, शैक्षणिक कर्जांची उपलब्धता वाढविण्यास आणि महामंडळांना अधिक कर्ज देण्यास निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आणि जिल्ह्यात वित्तीय समावेशनाला गती देण्याचे आवाहन केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.