‘दोन्ही कोट्यांमधून परीक्षासंधी मिळू शकत नाही’, पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण वाढवले.

 दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी खेडकर यांच्या वकिलांनी वेळ मागितल्यानंतर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १५ एप्रिलला ठेवली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने खेडकर यांना अटकेपासूनचे संरक्षण १५ एप्रिलपर्यंत वाढवले.१. अपंगत्वासह ओबीसी कोटा गैरवापराचा आरोप२. पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण वाढवले.सामान्य उमेदवार आणि अपंग उमेदवार अशा दोन्ही कोट्यांमधून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या संधी मिळू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी माजी भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सांगितले.

खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी व अपंगत्व कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी खेडकर यांच्या वकिलांनी वेळ मागितल्यानंतर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १५ एप्रिलला ठेवली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने खेडकर यांना अटकेपासूनचे संरक्षण १५ एप्रिलपर्यंत वाढवले. दिल्ली सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, उमेदवारांसाठी बनावट अपंगत्व प्रमाणपत्रे तयार करण्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या मध्यस्थांना ओळखण्यासाठी खेडकरांची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे.वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाचीच (यूपीएससी) फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही तिने बारा वेळा परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) पाठविलेल्या नोटिशीत समोर आली. त्याशिवाय परीक्षेसाठी त्यांनी इतर मागासवर्गासह (ओबीसी) बहुविकलांग प्रवर्गातून परीक्षा अर्ज भरला असून, वेळोवेळी आई-वडिलांच्या नावांतही बदल केला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.