नागपूरमध्ये झालेल्या हिसांचाराच्या घटनेवर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाची भूमिका ही विहिंप आणि बजरंग दलाची कान टोचणारी आहे असे दिसून येत आहे.नागपूरमध्ये घडलेल्या हिसांचाराच्या घटनेवर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाने म्हटले आहे की औरंगजेब हा सध्याचा संयुक्तिक मुद्दा नाही. तसेच संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही अशी भूमिका संघाने माडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळूरू येथील सभेत पत्रकाराकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी उत्तर दिले. त्यामुळे संघाने घेतलेली ही भूमिका त्यांच्याच संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनावरही ही भाष्य करणारी आहे.










