कामावरुन घरी निघालेले, वाटेत काळाचा घाला; भरधाव कारची दुचाकींना भीषण धडक अन् आक्रीत घडलं.

कर्जत – मुरबाड महामार्गावर एका कारने दुचाकींना दिलेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाले आहे. या अपघतानंतर कारचालक फरार झाल्याचं सांगण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कर्जत – मुरबाड राज्य महार्गावरील कळंब भागुचीवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर ब्रीजा कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर ब्रीजा कार चालकाने स्थळावरून पळ काढला. या अपघाताची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कळंब – मुरबाड रोडवर अरूण लक्ष्मण सोंगाळ (वय वर्ष ३२), धनाजी हनुमंत सोंगाळ (वय वर्ष ३०), विष्णू हरी सोंगाळ (वय वर्ष ३०), मालु बाबू मेंगाळ (वय वर्ष ३५), विजय मोतीराम मेंगाळ (वय वर्ष २०) तसंच दशरथ मधुकर खंडवी (वय वर्ष ४५) राहणार, गेटाचीवाडी पो. पाटगाव ता. मुरबाड जिल्हा ठाणे हे सर्व १७ मार्च २०२५ रोजी सकाळी आठच्या सुमारास कर्जत तालुक्यातील साळोख या गावी वॉल कंपाऊंडच्या कामासाठी आले होते.

त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता वॉल कंपाऊंडचं काम करुन घरी जाण्यास निघाले होते. घरी जात असताना कळंब हद्दीतील कर्जत मुरबाड राज्य महामार्गावरील भागुचीवाडी इथे आले असताना, मुरबाडकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या ब्रीजा कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि मुरबाडकडे आपल्या घरी जात असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. यांच्या दुचाकीला कारने धडक दिली आणि कार चालक तेथून पळून गेला. या अपघातानंतर दुचाकीवरील सर्वजण जखमी अवस्थेत रोडवर पडले होते.

जखमींना कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल कामोठे येथील एम.जी.एम रुग्णालयात नेण्यात येत होतं. त्यावेळी धनाजी हनुमंत सोंगाळ याचा मुत्यू झाला. तर विष्णू हरी सोंगाळ, विजय मोतीराम मेंगाळ आणि मालु बाबू मेंगाळ यांच्यावर पनवेल कामोठेतील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, ब्रीजा कार शैलेश दशरथ देशमुख राहणार (जडई, तालुका मुरबाड) यास पोलिसांनी अटक न करताना सोडून दिलं असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.