धक्कादायक! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण, जीवघेणा हल्लाही केला.

पुण्यातील स्वारगेट स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्ता गाडेच्या वकिलांचे अपहरण करुन त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे.पुण्यातील स्वारगेट स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे सध्या कोठडीत आहे, तर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्ता गाडेच्या वकिलांचे अपहरण करुन त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
सकाळ मीडियाच्या वृत्तानुसार, आरोपी दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. काल सायंकाळी ही घटना घडली आहे. काल सायंकाळी डोंगरेंचे हडपसर परिसरातून डोंगरेंचे अपहरण करण्यात आले त्यानंतर बोपदेप घाटात नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. हल्ल्याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. वकील डोंगरेंवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मुख्य आरोपी दत्ता गाडे याचे प्रमुख वकील वाजिद खान आहेत.

तर डोंगरे हे त्यांचे सहाय्यक वकील आहेत. याप्रकरणी न्यायालयीन कामकाज सुरु असताना वकिलांनीही वेगळाच दावा केला होता. दत्ता गाडे आणि तरुणीमध्ये संमतीने शरीर संबंध झाले होते. तर पीडितेच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पीडितेने मदतीसाठी ओरडही केली नाही. तसेच तिने आरोपीकडून पैसेही घेतल्याचा आरोप वकिल खान यांनी केला होता.२६ फेब्रुवारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात जुन्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली होती.

स्वारगेटहून फलटणला जाण्यासाठी बसची वाट बघत असताना आरोपी दत्ता गाडे ती एकटी असल्याचे पाहून तिला बसमध्ये घेऊन गेला. बस थोड्या वेळ्यात फलटणला निघत असल्याचे सांगून तिला त्याने बसमध्ये बसण्यासाठी सांगितले. जिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी दत्ता गाडे घटनास्थळावरून पळून गेला. तथापि, ७५ तासांच्या सर्च ऑपरेशननंतर पुणे पोलिसांनी गुणाट गावातून गाडेला अटक केली. दत्ता गाडे सध्या कोठडीत असून तपास सुरु आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.