आजच शाळेला सुट्टी लागली, आईसोबत रुद्र मामाच्या गावी निघाला, पण बसस्थानकातच दुर्दैवी अंत.

शाळेला सुट्ट्या लागल्याने आई आणि बहिणीसोबत मामाच्या गावाला निघालेल्या रुद्रचा बसस्थानकातच दुर्देवी अंत झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाचे वय केवळ ८ वर्षे होते.शाळेला सुट्ट्या लागल्याने आई आणि बहिणी समवेत मामाच्या गावाला जायला निघालेल्या एका आठ वर्षीय बालकाला बसने चिरडल्याने त्याच्या मृत्यु झाला आहे. रुद्र हरिशचंद्र मोरे असे या बालकाचे नाव असून तो तालुक्यातील मंदाणे गावचा रहिवासी आहे. इयत्ता दुसरीत तो शिकत होता. कुटुंबियांनी या मृत्यूसाठी महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तेथे वाहक उपस्थित नव्हता त्यामुळे निष्काळजीपणामुळे आम्ही आमचा मुलगा गमावल्याचे त्यांनी म्हणत मृत बालकाच्या कुटुंबियांनी आक्रोश केला आहे.नंदुरबारमधील साक्री येथे मामाच्या गावाला जायचे असल्याने मंदाणे येथून शहादा बस स्थानकात येऊन त्याची आई बहिण आणि रुद्र बसची वाट पाहत होता. अशातच नियमित फेरीला असणाऱ्या एका बसने रिव्हर्स घेतांना त्याला धडक दिली. त्यात चिरडल्याने तो खांब आणि बसच्या मध्ये अडकला. त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र याठिकाणी नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलीसांनी चालक आणि वाहका विरोधात गुन्हा दाखल केला असून चालक वाहन देखील  ठाण्यात हजर झाले आहे. घटनेनंतर मृत बालकांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केल्याचे पाहावयास मिळाले. बालकाचे शवविच्छेदन झाले असले तरी या घटनेनंतर महामंडळचा कोणीही अधिकारी पालकांचे सात्वन अथवा विचारपूस साठी आला नसल्याने मंदाणे ग्रामस्थांनी या विरोधात मुलाचे शव ताब्यात न घेण्याची भुमिका घेतली आहे.कुटुंबियांनी महामंडळाला रुद्रच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले.

ते म्हणाले की, मुलाच्या मृत्यूसाठी एसटी महामंडळ जबाबदार आहे. ज्यावेळी बस रिव्हर्स घेत होती त्यावेळी तेथे वाहक उभा नव्हता. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचा मुलगा गमावला आहे. आतापर्यंत महामंडळाचे कोणीच आले नाही. दुपारी दोन अडीच वाजता ही घटना घडली मात्र अनेक तास होऊनही महामंडळाचे कोणीच येऊन विचारपूस केली नाही. संबंधित वाहक आणि चालकावर कठोर कारवाईची मागणीही कुटुंबियांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.