ज्वाळांनी घेरलेली बस, जीव वाचवण्यासाठी तडफडणारे ‘ते’ चार जण; पुण्यातील थरकाप उडवणारं दृश्य.

पुण्यातील हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली आहे.हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज १ रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीची असणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. यावेळी या ट्रॅव्हल्समधून १२ जण प्रवास करत होते. प्रवास करणाऱ्या १२ पैकी ४ कामगारांचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी असल्याची माहिती आहे. या वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीने पेट घेतला आणि ही दुर्देवी घटना घडल्याची माहिती आहे.या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी फेज १ रोडवर उपस्थितांच्या अंगावर तेव्हा काटा आला जेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी या बसला लागलेली आग विझवली. समोरील दृश्य पाहून सारेच हादरुन गेले. ज्या चौघांचा या घटनेत मृत्यू झाला, त्यांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला होता.

मागच्या दाराने बाहेर येण्यासाठी ते प्रयत्न करत असतील, पण ते दार उघडलं नाही आणि तिथेच त्या चौघांनी आपला जीव सोडला. जेव्हा मिनी बसच्या मागचं दार उघडलं तेव्हा हे कर्मचारी एकावर एक पडलेले होते.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास हिंजवडी फेज वन येथे चालक कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना चालकच्या पायाखाली असणाऱ्या गाडीच्या भागाला आग लागली. ही गोष्ट चालकाच्या लक्षात येताच चालक आणि त्याच्या गाडीच्या समोरच्या सीटवर बसलेले कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, जे मागच्या बाजुला होते, त्यांना मागचा दरवाजा उघता आला नाही. त्यामुळे मागे बसलेल्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचे ठोके चुकले.

सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांचा हा दिवस शेवटचं ठरणार असेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. त्या चार जणांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वाहनाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मागच्या दरवाज्यात काही बिघाड झाला होता का याचा तपास पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.