गाझापट्टीत पुन्हा मृत्यूचे तांडव; इस्रायली हल्ल्यात ४०० पॅलेस्टिनींचा मृत्यू,५०० जखमी.

इस्रायलने मंगळवारी पहाटे गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले. यामध्ये महिला व मुलांसह तब्बल ४०० पॅलेस्टिनींचा मृत्यू व ५००हून अधिक नागरिक जखमी झाले, अशी माहिती रुग्णालय अधिकाऱ्यांनी दिली. जानेवारीपासून सुरू असलेली युद्धबंदी धुडकावून लावत इस्रायलने मंगळवारी पहाटे गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले. यामध्ये महिला व मुलांसह तब्बल ४०० पॅलेस्टिनींचा मृत्यू व ५००हून अधिक नागरिक जखमी झाले, अशी माहिती रुग्णालय अधिकाऱ्यांनी दिली.इस्रायलच्या या हल्ल्यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यांमध्ये किमान चार वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचे हमासने म्हटले आहे. युद्धबंदीचा पहिला टप्पा दोन आठवड्यांपूर्वी संपुष्टात आला होता. पुढील टप्प्यातील करारामध्ये बदल करण्याची मागणी हमासने फेटाळून लावल्यानंतर पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी हवाई हल्ल्याचे आदेश दिले.

ही कारवाई पुढे वाढण्याची शक्यता असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.इस्रायली लष्कराने नागरिकांना उत्तरेकडील बीट हनौन शहराचा बराचसा भाग व दक्षिणेकडील काही परिसराचा समावेश असलेल्या पूर्व गाझातून बाहेर पडण्याचे आणि प्रदेशाच्या मध्यभागी जाण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे इस्रायल लवकरच पुन्हा जमिनीवरील हल्लेदेखील सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच, ‘यापुढे हमासविरुद्ध वाढत्या लष्करी ताकदीने कारवाई केली जाईल’, असे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

रमजान महिन्यात केलेल्या या हल्ल्यांमुळे आधीच हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेतलेले युद्ध पुन्हा सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.अमेरिकेने या परिस्थितीला हमासला जबाबदार धरत इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ‘युद्धबंदी वाढवण्यासाठी दहशतवादी गट ओलिसांना सोडू शकला असता; परंतु त्याऐवजी नकार देऊन त्यांनी युद्धाला आमंत्रण दिले’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते ब्रायन ह्युजेस यांनी यांसदर्भात दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.