होणाऱ्या नवऱ्यासोबत पुण्यात फिरताना तरूणीचा विनयभंग, २४ तासांत पोलिसांकडून आरोपीचा करेक्ट कार्यक्रम.

पुण्यातील वानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याचा आरोपी राहुल संजय मिरेकरला तातडीने अटक केली आणि २४ तासांच्या आत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपीने एका तरुणीचा विनयभंग केला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करून त्वरित कारवाई केली.विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत आरोपीला अटक करून, त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची कामगिरी वानवडी पोलिसांनी केली. आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. राहुल संजय मिरेकर (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे.वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्चला रात्री दहा ते साडेदहा या वेळेत एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. पीडित तरुणी वैयक्तिक कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपी राहुल याने काहीही कारण नसताना तरुणीला अडवले. त्या वेळी तरुणीचा होणारा नवरा तिच्यासोबत होता. त्याने आरोपीला शिवीगाळ करू नको, असे सांगितले.

त्यावर आरोपीने तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे तरुणी त्याच्या मदतीसाठी धावली असता, आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन करून शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. मात्र, तिने धैर्य दाखवून सोमवारी (१७ मार्च) सायंकाळी साडेचार वाजता वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली.तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९, ३५२, ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. पोलिसांनी काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन, त्याला सोमवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. मंगळवारी (१८ मार्च) दुपारी लष्कर न्यायालयात त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. न्यायालयाने हे स्वीकारून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष जाधव आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची त्वरित कारवाई आणि २४ तासांत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.