आमच्या मुलीला मृत घोषित करा, २० वर्षीय विद्यार्थिनीच्या पालकांची पोलिसांना विनंती.

अमेरिकेतील यंत्रणा कॅरेबियन देशातील प्रशासनासोबत तिच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची चौकशी करीत होत्या. मोठ्या प्रमाणावर शोध घेऊनही तिचा मृतदेह हाती लागला नाहीआमच्या मुलीला मृत घोषित करण्यात यावे, अशी मागणी बेपत्ता असलेली २० वर्षीय भारतीय विद्यार्थिनी सुदीक्षा कोनानकीच्यापालकांनी डॉमिनिकन रिपब्लिकच्या  पोलिसांकडे केली आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. कोनानकी ही भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेची कायमस्वरूपी नागरिक आहे. ६ मार्च रोजी ती पुंटा कॅना या शहरातील रिऊ रिपब्लिक रिसॉर्टमध्ये शेवटची दिसली होती. ती डॉमिनिकन रिपब्लिक येथेअमेरिकेतील यंत्रणा कॅरेबियन देशातील प्रशासनासोबत तिच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची चौकशी करीत होत्या. मोठ्या प्रमाणावर शोध घेऊनही तिचा मृतदेह हाती लागला नाही.

‘कोनानकी कुटुंबीयांनी एक पत्र पाठवून तिला मृत घोषित करण्याची मागणी केली आहे’, असे डॉमिनिकन रिपब्लिक पोलिसांचे प्रवक्ते दिएगो यांनी सांगितल्याचे वृत्त एनबीसी न्यूजने मंगळवारी दिले आहे.याबाबत कोनानकी कुटुंबियांची प्रतिक्रिया तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान कोनानकी हिच्याबरोबर शेवटी दिसलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे, असे वृत्त सीएनएन न्यूजने दिले आहे.डॉमिनिकन रिपब्लिकचे अॅटर्नी जनरल येनी बेरेनिस रेनोसो यांनी जोशुआ स्टीव्हन रिबे यांची सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. स्थानिक अभियोक्त्याकडून ही चौकशी आणखी काही काळ सुरू राहण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जोशुआ रिबे याला या प्रकरणात संशयित मानले जात नाही, किंवा त्याच्यावर चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोपही केला गेलेला नाही. रिबे म्हणाला की, कोनानकीशी त्याची पहिली भेट हॉटेलमध्ये झाली, जेव्हा त्यांनी पाच मैत्रिणींच्या ग्रुपशी स्वतःची ओळख करुन घेतली. यावेळी दोन्ही ग्रुप्स बारमध्ये एकत्र गेले, तिथे त्यांनी मद्यपान केले. यावेळी कोणीतरी बीचवर जाण्याचं सुचवलं. असं रिबे याने चौकशीत सांगितलं.६ मार्च रोजी पहाटे रिऊ रिपब्लिक हॉटेलच्या बारमध्ये कोनानकी पाच तरुणी आणि दोन तरुणांसोबत मद्यपान करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. व्हिडिओमध्ये कोनानकी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात तिच्या मैत्रिणींना मिठी मारताना आणि त्यांच्याशी बोलताना दिसते. तर रिबे बारबाहेर काही फूट अंतरावरील लॉनवर वाकताना आणि काहीसा अडखळताना दिसतो.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.