वेड्या बहिणीची वेडी माया! दादाच्या मृत्यूचं दु:ख सहन होईना, अवघ्या तीन तासात बहिणीने प्राण सोडले, जळगाव हळहळलं.

जळगाव येथे एकाच दिवशी बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने दोन गावात शोककळा पसरली आहे. येथे भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून बहिणीला हार्ट अटॅक आला आणि त्यात तिचाही मृत्यू झाला.मायेचा हात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची वार्ता कानावर पडताच बहिणीला मोठा धक्का बसला. भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे व्याकूळ झालेल्या लहान बहिणीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिनेही अवघ्या तीन तासातच आपले प्राण सोडले. अतूट प्रेम असलेल्या या बहीण-भावाच्या अंत्ययात्रा वेगवेगळ्या गावात पण एकाच दिवशी काढण्याची वेळ आल्याने अवघ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही हृदय हेलावले आहे. जिल्ह्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.अमळनेर येथील धुळे-नंदुरबार ग. स. सोसायटीचे निवृत्त व्यवस्थापक रमण सखाराम पाटील (वय ५९) पत्नी प्रतिभा यांच्यासह पुणे येथील मुलीकडे गेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे रविवारी साडेपाच वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृत्यूची वार्ता जळगाव जिल्ह्यातील नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेरला आणण्याची तयारी झाली.

पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रमण पाटील यांच्या पाठच्या बहीण ललिता रावसाहेब काटे-पाटील यांना मायेचा हात सतत पाठीशी असलेल्या भावाच्या मृत्यूची वार्ता मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. ही बातमी ऐकून त्यंनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ अमेळनेरा येथील खासगी रुग्णलयात उपचारासाठी आणले. मात्र, भावाच्या मृत्यूपाठोपाठ अवघ्या तीन तासात साडेआठ वाजता ललिता यांचीही प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. भाऊ-बहिणीच्या नात्यातील या अतूट प्रेमाने उपस्थितांच्याही डोळे पाणावले.

या घटनेने दोन्ही गावात एकच शोककळा पसरली.सोमवारी रमण पाटील यांच्यावर सकाळी दहा वाजता अमळनेर शहरातील पैलाड भागात असलेल्या अमरधाममध्ये दहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, दुपारी एक वाजताच्या सुमारास पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे ललिता काटे -पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने दोन्ही गावात शोककळी पसरली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.