जाडगाव येथील सरपंच यांचे बेमुदत उपोषण.रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी जाडगाव तालुका भुसावळ.
दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र सर्वाधिक बाधित असलेले गाव जाडगांव. या गावातील तरुणांना रोजगार दिला जात नाही . जाडगाव येथील सरपंचांनी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी 17 मार्च ला बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
प्रशासनासोबत 25 नोव्हेंबर 2022 या दिवशी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसोबत मीटिंग झाली या मीटिंगमध्ये बेरोजगार युवकांची यादी दिल्यानंतर त्यांच्या कौशल्याच्या निकषच्या आधारावर आम्ही त्यां बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले तरी आपण दिलेल्या पत्रानुसार आपण कुठलेही बेरोजगाराला रोजगार दिला नाही
म्हणुन दिपंनगर प्रशासनाच्या विरुद्ध बूस्टरपंप हाऊस जवळ फुलगावं , जाडगांव शिवरात येथे जाडगाव गावाचे सरपंच निखिल सुरवाडे यांचे बेमुदत उपोषण दि १७/०३/२०२५ पासून सुरू आहे आहे तरी या उपोषणाला जाडगाव गावातील युवा वर्ग तसेच समस्त गावकरी आणि आदिवासीं कोळी महासंघ भुसावळ तालुका यांचा जाहिर पाठिंबा दिला.









