भर दुपारी स्वतःच्याच शेतात १३ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल, परिसरात हळहळ.

केवळ आठव्या वर्गात शिकत असलेला कृष्णा नेमक्या कोणत्या तणावात होता हे देखील समजायला मार्ग नाही. याबाबत तोंडी फिर्यादी रिपोर्ट वरून पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोळंके यांनी प्रकरण दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव येथील कृष्णा सुनील जमेवार वय वर्ष १३ राहणार कौलखेड याने आपल्या स्वतःच्या शेतात मंगळवारी दुपारी लाकडी टूनीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. केवळ आठव्या वर्गात शिकत असलेला कृष्णा नेमक्या कोणत्या तणावात होता हे देखील समजायला मार्ग नाही. याबाबत तोंडी फिर्यादी रिपोर्ट वरून पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोळंके यांनी प्रकरण दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. नांदुरा ठाणेदार विलासराव पाटील यांच्या आदेशाने प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चोपडे यांच्याकडे देण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.सदर घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन नांदुराचे कमलेश बोके, विलास निंबोळकर कृष्णा वसुकार अश्विन फेरण ,बाळू पाटील नांदुरा प्रेस क्लब उपाध्यक्ष गजानन डाबेराव, विजय डाबेराव नांदुरा पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल गजानन चोपडे गजानन इंगळे संजय वराडे घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करण्यास सुरुवात केली होती.

रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर कृष्णावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णा हा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा कौलखेड येथील आठवीचा विद्यार्थी असल्याचे समजते या संपूर्ण घटनेमुळे निमगाव व परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे. कृष्णाचे नातलग हरिदास श्रीराम जमेवार यांनी सदर फिर्याद नांदुरा पोलीस स्टेशनला दिली.का वाढत आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या?

प्रचंड चढाओढ, स्पर्धात्मक जीवनशैली, जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचा ताण वाढवून घेण्याची लागलेली सवय सोबतच आजच्या डिजिटल हायटेक युगात जुळवून घेण्याची धडपड. यांमुळे, आपल्या आयुष्याचा प्रवास किती झटपट सुरू होतो आणि संपत आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्यामध्ये ज्या वयात ताण यायला नको त्याच वयात प्रचंड मानसिक ताणाला विद्यार्थी सामोरे जातायत. आणि त्यांच्याकडून नको तेच घडत आहे .तशा बाबी समोर येत असल्याने विशेषतः पालक वर्गात चिंतेची बाब दिसून येत आहे याला मुख्य कारण कोणते याच्या मुळापर्यंत जाणं देखील गरजेचे आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.