यावल तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत मोहराळा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून सन 2021 ते 2023 या वर्षामध्ये 15 वित्त आयोगा अंतर्गत तसेच इतर योजनेमधून जे कामे झाले आहेत. ते सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.

त्या सर्व बोगस कामाची चौकशी/ऑडिट करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व सदर कामे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात आली होती. त्यांची सुद्धा चौकशी करून ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे केली असतील त्यांचे लायसन्स काळ्या यादी टाकण्यात यावे अशी मागणी भिम आर्मी चे जिल्हा सचिव यांनी केली आहे .वरीलपैकी कोणत्याही प्रकारची चौकशी व कारवाई न झाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटने कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे देखील संघटनेचे जिल्हा सचिव व जिल्हा प्रसिद्ध प्रमुख यांनी म्हटले आहे. वरील दिलेल्या तक्रार अर्ज मध्ये कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांचे मुक संमती आहे. असे समजण्यात येईल व आपल्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येईल. भिम आर्मी भारत एकता मिशन च्या पदाधिकाऱ्यांनी यावल पंचायत समिती सहाययक गट विकास अधिकारी बा. का. पवार यांच्या कळे लेखी निवेदन दिले.









