बॉयफ्रेण्डच्या साथीने मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याला संपवलं, बॉडी ड्रममध्ये टाकून सिमेंट भरलं, पत्नीचा कारनामा.

मर्चंट नेव्हीमध्ये असणारा पती पत्नीच्या वाढदिवसाला घरी आला. मात्र, हा निर्णय त्याच्यासाठी अत्यंत घातक ठरला. रजेवर घरी आलेल्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून खून केला.नौदलात असलेला पती आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करायला घरी आला होता. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिच पत्नी त्याचा जीव घेईल. पत्नीने प्रियकरासोबत मिळून या पतीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये टाकला आणि वर सिमेंट टाकून लोखंडी झाकणाने तो बंद केला. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडल्याची माहिती आहे.कोणाला शंका येऊ नये म्हणून पत्नी पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना मेसेज आणि फोन करत राहिली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

सौरभ राजपूत असं या पतीचं नाव असून तो पत्नी मुस्कान आणि सहा वर्षांच्या मुलीसह ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनगर भागात भाड्याच्या घरात राहत होता. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता आणि फेब्रुवारीमध्ये रजेवर घरी आला होता. त्याने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सुट्टी काढली होती. पण, पत्नी मुस्कानचे साहिल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी सौरभला आपल्या वाटेतून दूर करण्याचा कट रचला.सौरभ घरी आल्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याची हत्या केली. त्यांनी सौरभवर चाकूने हल्ला अनेक वार केले, त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिक पिशवीत भरले. त्यानंतर एका मोठ्या ड्रममध्ये ही पिशवी टाकली, त्यामध्ये सिमेंट भरलं आणि मग वरुन लोखंडी झाकणाने ते सील करण्यात आलं.दरम्यान, मुस्कानने आपल्या आईला फोन करुन या घटनेची माहिती दिली. आईने याबाबत मुस्कानच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांनी थेट पोलिसांत जाऊन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि ड्रिल मशिनचा वापर करून ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.