विहिरीचं खोदकाम सुरु असताना मोठी दुर्घटना, अंगावर मलबा कोसळून दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, पंचक्रोशीत हळहळ.

ब्लास्टिंगदरम्यान विहिरीत मशीनद्वारे छिद्र करण्याचं काम सुरु होते. याचवेळी अचानक विहिरीचा काही भाग खचून मजुरांच्या अंगावर मलबा पडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले आहेत.रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील शेतात विहिरीचं खोदकाम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. ब्लास्टिंगदरम्यान विहिरीत मशीनद्वारे छिद्र करण्याचे काम सुरु होते. याचवेळी अचानक विहिरीचा काही भाग खचून मजुरांच्या अंगावर मलबा पडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

वृत्तानुसार, रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील शेतकरी रमेश धांडे यांच्या शेतातील विहिरीचे खोलीकरणाचे काम सुरू होते. याचवेळी विहिरीचा काही भाग अचानक खचून दोन मजुरांच्या अंगावर पडला. मोठ्या प्रमाणात मलबा अंगावर पडल्याने दोन्ही मजूर त्याखाली दबले गेले. तेथे उपस्थित इतर मजुरांनी त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र मलबा जास्त प्रमाणात असल्याने त्यांना तो हटवण्यासाठी वेळ लागला. नंतर क्रेनच्या साहाय्याने मलबा काढण्यात आला परंतु तोपर्यंत दोन्ही मजुरांचा दुर्देवी अंत झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदनासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.प्रल्हाद उकंडा देवकर रा. एकलासपूर आणि प्रकाश रावसाहेब देशमुख रा. मोठेगाव अशी मृत मजुरांचे नावं आहेत. हे दोघेही घरातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर परिसरातील नागरिकांचीही गर्दी उसळली होती. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.