पाकिस्तानी लोकांनी लुटलं चीनी कॉल सेंटर, कंप्युटर सोबतच स्विचबोर्ड, बाथरूमचे नळ आणि खिडक्या घेऊन पळाले.

हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही डोक्याला हातच लावाल, शॉपिंग मॉल लुटल्यानंतर आता पाकिस्तानी लोकांनी कॉल सेंटर लुटलं. त्यांनी कंप्युटरसोबत हातात मिळेल से सामान पळवलं. अगदी खिडकीच्या काचा सुद्धा सोडल्या नाहीत.पाकिस्तानात एका पेक्षा एक नग भरले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हेच प्रकरण पाहा ना, पाकिस्तानमध्ये काही चीनी कंपन्या फेक कॉलसेंटर चालवत होत्या. या कॉल सेंटर्सच्या माध्यमातून पाकिस्तानी लोकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. दरम्यान या फेक कॉल सेंटर्सबद्दलची माहिती मिळताच फेडरल इन्वेस्टिकेशन एजंसीनं या कॉल सेंटर्सवर धाड टाकली.

पण पोलिसांच्या हाती काही लागण्याआधीच लोकांनीच या इमारतीला लुटून नेलं. होय, जे सामान पोलीस जप्त करणार होते ते लोकांनी पळवून नेलं. अगदी भिंतीवरचे स्विच बोर्ड सुद्धा सोडले नाहीत. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. (फोटो सौजन्य – @KreatelyMedia/Twitter ही घटना इस्लामाबादमध्ये घडली आहे. @KreatelyMedia या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. लोक कंप्युटर स्क्रीन, सीपीयु, फोटोकॉपी मशिन्स असं हातात मिळेल ते सामान घेऊन पळत आहे. पाकिस्तानी लोकांनी अख्खी इमारत काही तासांमध्ये लुटून नेली. समोर आलेल्या माहिती नुसार लोकांनी भिंतीवरचे स्विचबोर्ड सुद्धा सोडले नाहीत. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा हाच विचार करत असाल, कौन हैं ये लोग? कहाँ से आते हैं ये? पोलिलांच्या हाती काहीच लागलं नाही. आता पुराव्यांअभावी पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करणार कशी? असा प्रश्न निर्माण झालाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पाकिस्तानी लोकांनी फिरकी घेत आहेत. कोणी म्हणतेय, हे लोक कंप्युटर घरी नेऊन करणार काय? कारण त्यांना कंप्युटर कसा वापरायचा ते माहितच नाहीये. तर कोणी म्हणतेय, चोरी करण्यात पाकिस्तानचा हात कोणीच धरू शकणार नाही. लक्षवेधी बाब म्हणजे यापूर्वी पाकिस्तानी लोकांनी एक नवा कोरा मॉल लुटला होता. त्यामुळे हे लोक काहीही करू शकतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.