दोन चिमुकल्या लेकरांना सोडून आई निघून गेली, तिने स्वत:ला संपवल्याचा दावा, पण तिच्या आई-वडिलांचा…

जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. पण विवाहितेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे.सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे, असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री घरी कोणी नसताना 22 वर्षीय सोनी चव्हाण हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र ही घटना सोनी चव्हाण यांच्या माहेरी कळल्यानंतर त्यांनी ही आत्महत्या नसून सोनी हिला पती आणि सासरच्या मंडळींनी मारून टाकले असल्याचा आरोप केला आहे.

जळगाव तालुक्यातील धानवड येथे सोनी चव्हाण(वय 22) ही विवाहिता आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. सोनी हिने सोमवारी १७ मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसताना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या आई आणि वडिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेत आक्रोश केला.गेल्या तीन वर्षांपासून तिचे पती चेतन गजानन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारू पिऊन मारहाण करणे सुरूच होते. त्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापूर्वीं देखील विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आत्महत्या नसून तिला गळफास देवून ठार मारले आहे, असा आरोप मयत विवाहिता सोनी चव्हाण यांची आई अनिता विनोद जाधव यांनी केला आहे. अनिता जाधव या सोयगाव तालुक्यातील नांद्रा ताड या गावच्या आहेत.दरम्यान, आपल्याला मुलीला ठार मारणाच्या आरोप करत तिच्या पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी मृतक महिलेच्या आई-वडिलांनी केली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात सात्विक (वय-३), प्रथमेश (वय-५) ही दोन मुलं, आई-वडील, एक भाऊ, लहान बहीण असा परिवार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.