पुण्यातील कस्तुरी चौकातील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीवर तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या नराधमाने जबरदस्तीने चुंबन घेतले आणि अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी व भावाने शोध सुरू केला.पुण्यात पुन्हा एकदा स्त्री अत्याचाराची घटना घडली आहे. शहरात अशा घटनांचे प्रमाण सतत वाढत आहे. पुण्यातील कस्तुरी चौकातील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीवर तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या नराधमाने जबरदस्तीने चुंबन घेतले आणि अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी व भावाने शोध सुरू केला. अखेर, ती आरोपीच्या घरात, वॉशिंग मशीनच्या शेजारी भयभीत अवस्थेत सापडली. त्यावेळी तिच्या शरीरावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या वडिलांनी २४ वर्षीय आरोपी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दिली आहे.










