ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! नागपूर हिंसाचारावर हेमंत ढोमे बोललाच, तरुणांना केली ही विनंती.

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेनं कबर हटवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

शहरात तणावपूर्ण शांतता आहे. औरंगजेब कबर काढून टाकण्याच्या मुद्यावरून रोज राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानं शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील तरुणांनी संयम दाखवायला हवा, अफवांना बळी पडू नये, असं आवाहान करण्यात येत आहे. या सगळ्या परिस्थितीवर आता सिनेइंडस्ट्रील कलाकारही व्यक्त होत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानं ट्विट करत समजुतदारपणानं वागण्याची विनंती केली आहे. काय आहे हेमंत ढोमेचं ट्विट?नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती! कृपया शांतता आणि सलोखा जपा!

ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा!
ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा!
ते बरळतील, आपण विचार सांगायचा!

शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा! जय महाराष्ट्र

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.