सहकार क्षेत्रातला मोठा चेहरा भाजपच्या गोटात, माजी आमदाराचा भव्य पक्षप्रवेश.

विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार सिताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट (Sitaram Ghandat) आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले इंजिनिअर सुरेश फड या दोघांनीही वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) रामराम ठोकला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोघांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला चांगलाच झटका बसला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांचा प्रवेश भारतीय जनता पक्षाला चांगलेच बळ मिळवून देणारा ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार सिताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. सिताराम घनदाट यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मतदारसंघात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. सिताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्षही आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचे चांगले काम असल्याने त्यांची परभणी जिल्ह्यात मोठी ताकद आहे.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, त्यामुळे माजी आमदार सिताराम घनदाट यांनी निवडणुकीची तयारी देखील केली होती, पण ऐनवेळी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि त्यामुळे त्यांनी नाराज होऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.तीन महिन्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती धरला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना तीन नंबरची मते मिळाली.

त्यामुळे सिताराम घनदाट यांच्या भाजप प्रवेशाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढणार हे निश्चित मानले जात आहे.दुसरीकडे, पाथरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढलेल्या सुरेश फड यांनी देखील आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मागील काही वर्षापासून इंजिनिअर सुरेश फड वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. तशी परभणी लोकसभा मतदारसंघात त्यांनी पक्षबांधणी देखील केली होती. पण लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना तिकीट मिळाले नाही.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. इंजिनीयर सुरेश फड यांनी देखील आज कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.माजी आमदार सिताराम घनदाट व इंजिनिअर सुरेश फळ या दोघांच्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद चांगलीच वाढणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीला मात्र चांगलेच मोठे खिंडार पडले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील तीनही पक्ष मोठ्या प्रमाणावर प्रवेश करून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील असाच पक्षप्रवेश सोहळा झाला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.