तीन चिमुकल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या, इतक्यात स्लॅब कोसळला अन् दोघींचा चटका लावणारा अंत; कुटुंबावर शोककळा.

जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने डहाणू तालुक्यात भीषण दुर्घटना घडली आहे. टाकीचा स्लॅब कोसळून मुली खाली पडल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने डहाणू तालुक्यात भीषण दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीवर तीन मुली चढत असताना टाकीचा स्लॅब कोसळून मुली खाली पडल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीत सुकड आंबा- शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या परिसरात तीन मुली खेळत होत्या. याचदरम्यान तीनही मुली ३० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढल्या. मात्र याचदरम्यान टाकीचा स्लॅब कोसळल्याने दोन मुली थेट खाली पडल्या. ३० फूट उंचीवरून थेट खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा जागीच मत्यू झाला आहे. तर एक मुलगी लॅबला अडकल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला मात्र ती जखमी झाली आहे.

तीनही मुलींना तातडीने सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर कासा येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तेथे घोषित केले.हर्षला रघु पागी (वय ११), संजना प्रकाश राव (वय १२) अशी अपघातात या दुर्घटनेतील मृत मुलींची नावे आहेत. रीना रशू फरारा (वय ११) ही मुलगी जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात उभारण्यात आलेला या पाण्याच्या टाकीचे काम हरेश बोरवेल कंपनीच्या ठेकेदारामार्फत हाती घेण्यात आले होते. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करावी आणि कठोर शिक्षा करण्याची मागणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांकडून केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.