कायदा हातात घेऊ नका, सायबर टीम लक्ष ठेवून, अफवा पसरवल्यास कारवाई होणार; नागपूर राड्यावर पोलिसांची प्रतिक्रिया.

 नागपुरात दोन गटात राडा झाल्यानंतर दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पोलिसांनी अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.नागपुरात दोन गटात मोठा राडा झाला आहे. यानंतर नागपुरातील महाल परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन गट समोरासमोर आल्यानंतर दगडफेक करण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीवरुन झालेला वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला असून यात दगडफेक, तसंच वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहेत. तसंच पोलिसांच्या वाहनांचं, इतरही काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. नागपूरचे सर्व वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांकडून उपद्रवींना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.दुपारी आंदोलन झालं होतं, त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घातलेल्या समजुतीनंतर संपूर्ण प्रकरण शांत झालं होतं. मात्र त्यानंतर संध्याकाळी पुन्हा दोन गट समोरासमोर आले आणि मोठा राडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय लहानशा गल्लीमध्ये दोन गटातील लोक समोरासमोर आले. जाणूनबुजून ही जाळपोळ, दगडफेक करण्यात आली आहे. यात काही पोलीस जखमी झाले आहेत.संध्याकाळी काही लोक नमाजसाठी जमा झाले होते. ते नमाजनंतर पुन्हा एकत्र आले. तसंच दुसऱ्या गटातील लोकही जमा झाले होते. दोन्ही गट यावेळी समोरासमोर आले.पोलिसांकडून सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे, की घटनास्थळी पोलीस हजर आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, ज्या लोकांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतलं आहे.

कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी अफवा पसरवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांची एक सायबर टीम या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. कोण, कोणत्या ग्रुपमध्ये काय टाकत आहे, असं काही आढळल्यास त्यावर सायबर टीम लक्ष ठेवून असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, शहराच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर, दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.