नाशिकमधील PSI प्रशिक्षणार्थीचा धक्कादायक निर्णय; पोलिस अकादमीतील हॉस्टेलमध्येच संपवलं जीवन.

गोरे यांनी २०२० मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून ते एमपीएमध्ये वास्तव्यास आहेत.प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून २०२५ मध्ये पोलिस सेवेत रुजू झालेले सोमेश्वर भानुदास गोरे (वय २८, रा. बीड) यांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. महाराष्ट्र पोलिस अकादमीतल्या (एमपीए) वसतिगृहातील राहत्या खोलीत त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.बीड जिल्ह्यातील धोंडगाई गावचे मूळ रहिवासी असलेले सोमेश्वर गोरे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. गोरे यांनी २०२० मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( एमपीएससी ) परीक्षा उत्तीर्ण केली.

दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून ते एमपीएमध्ये वास्तव्यास आहेत . काही दिवसांपूर्वी पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अंतर्गत व बाह्य प्रशिक्षण वर्गात ते हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे गोरे विवंचनेत होते, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.पुसद तालुक्यातील बुट्टी इजारा येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली.

मधुकर तुकाराम चव्हाण, असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे . शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता . सततच्या नापिकीने कर्जाचा भार वाढल्याने मधुकर हे आर्थिक अडचणीत होते .यातच पत्नीच्या उपचारासाठी अधिकचा खर्च करावा लागत होता. या विवंचेत असतानाच मधुकर यांनी शेतात विषारी औषध घेतले. हे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.