“तुझ्यामुळे आमचा मुलगा आईला शिवीगाळ करतो. तुझ्यामुळे, स्वतःच्या आईचा मृत्यू झाला तर पाणी टाकायला कोणी नसेल असं म्हणतो” असे म्हणत बुक्क्यांनी मारहाण केली. तीनही महिला चांगल्याच संतापल्या होत्या. यामुळे हा वाद टोकाला गेला.आपल्या भावासोबत आणि मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन एका बहिणीने आणि तिच्या आईने एका तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुली सोबत अफेअर असल्यामुळे मुलगा आईला शिव्या करत असल्याने तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानात गाठले. मुलासोबत अफेअर का ठेवते? त्याला घरात का घेते? असं म्हणत केस धरून पोटात लाथा मारत बेदम मारहाण केली. ही घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील एन ११ परिसरातील एका उद्यानात घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एन ११ सिडको परिसरातील उद्यानात २५ वर्षीय तरुणी बसली होती. या तरुणीचा पाठलाग करत अचानक तीन महिला त्या उद्यानात आल्या. मुलीला काही कळण्याच्या आत या महिलांनी तरुणीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तू आमच्या मुलासोबत अफेअर का ठेवते? असं म्हणत त्या महिलांनी तीचे केस ओढत तिला मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या महिलेने, “तुझ्यामुळे आमचा मुलगा आईला शिवीगाळ करतो. तुझ्यामुळे, स्वतःच्या आईचा मृत्यू झाला तर पाणी टाकायला कोणी नसेल असं म्हणतो” असे म्हणत बुक्क्यांनी मारहाण केली. तीनही महिला चांगल्याच संतापल्या होत्या.









