खरीप पिक विमा 2024 व बीटी वाण , विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे पारोळा येथे निवेदन .

खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांचा कापूस मका ज्वारी बाजरी उडीद मूग सोयाबीन अशा विविध पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु जून महिन्यापासून सततचा पाऊस म्हणजेच अतिवृष्टी अशा अतिवृष्टीने सप्टेंबर अखेरपर्यंत रिप्रीत पावसाने कापूस ज्वारी बाजरी मका सोयाबीन उडीद मूग या पिकांची नासधूस केली परिणामी कापूस या पिकाच्या कैऱ्या सडून दुर्गंध युक्त उग्र स्वरूपाचा वास येऊन परिणामी बोंड आळी चा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांच्या पिकाला जणू काही वरून राजाची नजर लागली,
शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे स्वप्न डोळ्यासमोर चकनाचूर होऊन शेतकरी हतबल झाला अशा सततच्या पावसाने शेतकऱ्याचे चांगलेच कंबरडे मोडले.

शासन व सरकार पिक विमा कंपनी यांनी खरीप 2024 चा पिक विमा मंजूर करावा अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव पारोळा च्या वतीने तहसील कार्यालय तसेच कृषी विभाग कार्यालय यांना निवेदन दिले .शेतकऱ्यांच्या मागण्या, कापूस बोलगार्ड 1 व बोल गार्ड 2 हे वाण बोंड आळी ला प्रतिकार करत नसल्याने पुढील उच्चतंत्रज्ञान म्हणजे जी एम कापसामध्ये वापरावे, पंतप्रधान सन्मान निधीचे बरेचसे लाभार्थी तहसील व कृषी आवारात चकरा मारतात त्यांचा प्रश्न निकाली काढून त्वरित त्यांना न्याय द्यावा मागील वर्षाचे कापूस सोयाबीन उर्वरित शेतकरी अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या अकाउंटला देण्यात यावे वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे संरक्षण होण्यासह शासनाने अनुदानावर कुंपण योजना तौरीत राबवावी खरीप पिक विमा 2024 चा लाभ त्वरित द्यावा अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने तहसीलदार अनिल पाटील तसेच कृषी अधिकारी दीपक अहिर यांना निवेदन दिले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष प्राध्यापक बिकनराव पाटील संघटक गुलाब पाटील भाऊसाहेब पाटील गुलाब वाघ कौतिक चौधरी निलेश देशमुख किरण पाटील सुरेश पाटील कलश शिंपी मच्छिंद्र पाटील गोरख पाटील विकास पाटील कृष्णाकांत पाटील ज्ञानेश्वर पाटील योगराज पाटील रामभाऊ पाटील नारायण पाटील संजय केदार अनिल पाटील जगदीश पाटील यासह तालुक्यातील बरेचसे शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.