“ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं. त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावं लागत आहे”, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी यामागील कारण देखील सांगितलं आहे. “या देशामध्ये महिमा मंडळ होईल तर ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल. औरंजेबाच्या कबरीचा होणार नाही. दुर्दैव आहे की 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं. त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावं लागत आहे”, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भिवंडी तालुक्यातील मारडे पाडा येथे छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.”एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडळ प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही.










