पोटच्या पोराला विहिरीत ढकललं, नंतर हरवला असल्याचा बनाव; ४ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ उकललं.

आईनेच आपल्या लेकाला मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.आईसारखं प्रेम जगात कोणीही करू शकत नाही असं म्हटलं जातं. पण एका आईनेच आपल्या लेकाचा जीव घेतल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी आईने मुलाला विहिरीत ढकलून त्याची हत्या केली. नंतर मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव रचला. आईने निर्दयीपणे आपल्या मुलाची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकलून त्याची हत्या केली. त्यानंतर महिलेने कोणालाही संशय येऊ नये यासाठी आपल्या पतीला फोन करुन मुलगा हरवला असल्याचा बनाव रचला, तसंच त्याला लवकरात लवकर शोधा असंही तिने सांगितलं.

राजस्थानातील उदयपूरमध्ये ही घटना घडली.त्यानंतर चिमुकल्याच्या वडिलांनी आपल्या मुलाची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी एका विहिरीत ४ वर्षीय मुलाचा मृतदेह दिसला. पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पुढील चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी मुलाबाबत त्याच्या आईकडे चौकशी केली असता, तिने मला याबाबत काहीही माहिती नसल्याचं सुरुवातीला सांगितलं. यावेळी पोलिसांनी संशय आला होता.पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या आधारे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चिमुकल्याची आई त्याला विहिरीजवळ घेऊन गेली आणि अचानक त्याला धक्का दिला आणि तिथून ती घरी आली. नंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुलगा बेपत्ता झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांना संशय आला, यातून केलेल्या चौकशीत मुलाची हत्या करणारं दुसरं – तिसरं कोणी नसून चिमुकल्याची आईच होती. पोलिसांनी तिला अटक केली.दरम्यान, आरोपी महिला तिच्या सासरच्या आणि माहेरच्या अशा दोन्ही मंडळींकडून त्रासलेली होती. तिने मुलाच्या हत्येआधी स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर तिने मुलाला विहिरीत ढकलून त्याची हत्या केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.