खुलताबादमध्ये तणावपूर्ण शांतता, एसआरपीएफसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.

औरंगजेबच्या कबर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे, ज्यामध्ये एसआरपीएफचे शस्त्रधारी जवान आणि दंगल नियंत्रण पथकाचा समावेश आहे. शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पर्यटकांची नोंद केली जात आहे. पोलिस प्रशासनाने घटनांवर बारीक लक्ष ठेवले आहे.औरंगजेब कबर परिसरात ‘एसआरपीएफ’चे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकातील २५ पोलिस जवान, ६० पोलिस अंमलदार, महिला पोलिस, भारतीय पुरातत्त्व विभागाचे खासगी सुरक्षारक्षक असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. औरंगजेब कबर परिसरातील रस्त्यावर दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, औरंगजेब कबर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नोंद केली जात आहे.
रविवारी दिवसभर खुलताबाद शहरात तणावपूर्ण शांतता होती. मात्र, शहरातील अनेक भागांत दुकाने, व्यवहार सुरळीत सुरू होते.

शनिवारपासून शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. खुलताबाद शहरातील शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी गस्त घालताना दिसत आहेत. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. शहराचे प्रवेशद्वार असलेले नगारखाना गेट ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बसस्थानक या भागांत वाढीव बंदोबस्त होता. सध्या राजकिय नेत्यांकडून औरंगजेबच्या कबरीबद्दल अनेक विधाने केली जात आहेत. बजरंग दलाकडून तर मोठी मागणीच करण्यात आलीये. यामुळे औरंगजेबच्या कबरच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. खुलताबाद शहरात रविवारी शांतता होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाढीव बंदोबस्त होता.शहरामध्ये वाहतूक सेवा आणि इतर व्यवहार सुरू आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी खुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी अगोदरच पूर्ण तयारी केल्याचे चित्र बघायला मिळतंय. सध्या खुलताबादमध्ये मोठा फाैजफाटा हा पोलिसांचा बघायला मिळतोय, काही पर्यटक नेहमीप्रमाणे ही कबर पाहण्यास देखील पोहोचले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.