अखंड हरीनाम वारकरी किर्तन सप्ताहाचे आयोजन. भडगाव तालुका प्रतिनीधी : यशकुमार पाटील भडगाव : शहरात जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव च्यापर्वकाळात अखंड हरीनाम वारकरी किर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले असुन आज दि.१६ मार्च प्रथम दिवसाची सेवा ह.भ.प. रविंद्र महाराज, तारखेडा १७ मार्च रोजी ह.भ.प. सुनिताताई महाराज, पाचोरा १८ मार्च रोजी ह.भ.प. खुशाल महाराज, चाळीगावकर १९ मार्च रोजी ह.भ.प. मनोज महाराज,
हातगावकर २० मार्च रोजी ह.भ.प. स्वप्निल महाराज, गिरडकर २१ मार्च रोजी ह.भ.प. स्नेहलताई महाराज, सामनेरकर २२ मार्च रोजी ह.भ.प. साहिल महाराज, तळेगावकर तर २३ मार्च रोजी ह.भ.प. हरि महाराज वृदांवनधाम याचे काल्याचे किर्तन होईल दररोज पहाटे ५ ते ६ काकड आरती,
संध्याकाळी ६ वाजता ज्ञानोबा माउलीचा हरिपाठ व रात्री ९ ते ११ किर्तन दिनांक २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पालखी सोहळा तर दि. २३ मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान जय हरि माउली भजनी मंडळ, श्रीपाद माउली भजनी मंडळ, व सप्ताह नियोजन समिती, खालची पेठ भडगावच्या वतीने करण्यात आले आहे.









