नांदेडहून नाशिकमध्ये आलेल्या तरुणामुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे घेतलेल्या गळफासाने महिला घरमालकिणीने आत्महत्या केली. संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. नांदेड जिल्ह्यातून नाशिकमध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरुणाला एका घरात महिलेने भाडेतत्त्वावर आसरा दिल्यावर काही महिन्यांनी त्या तरुणाकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रास छळाला त्रासलेल्या घरमालकिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरधाम परिसरात घडली. पूजा मल्हार घेगडमल (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मुलीच्या फिर्यादीवरून संशयित शंकर रमेश खाडेकर (२५, रा. अर्धापूर, नांदेड) याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी खाडेकरला अटक केली आहे.
मृत घेगडमल यांच्या अठरा वर्षीय विवाहित मुलीने यासंदर्भात भद्रकाली पोलिसांत तक्रार केली आहे. घेगडमल या त्यांच्या दोन मुलींसह अमरधाम परिसरातील शीतळादेवी मंदिरालगतच्या खोलीत राहत्या होत्या. घेगडमल या त्यांच्या पहिल्या पतीपासून विभक्त असून, त्यांनी सिडकोतील एका व्यक्तीशी दुसरा विवाह केला होता. परंतु, अमरधाम परिसरातील खोलीची साफसफाई आणि पाणी भरण्यासाठी घेगडमल या सिडकोतून तेथे येत होत्या. घेगडमल यांच्या एका मुलीचे पंधरा दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.दरम्यान, घेगडमल यांच्या खोलीत संशयित जानेवारी २०२४ पासून वास्तव्यास होता. संशयिताविरुद्ध परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने घेगडमल यांनी काही महिन्यांपूर्वी त्याला घर खाली करण्यास सांगितले. त्यानंतर संशयित घेगडमल यांच्या खोलीजवळ येत ‘मला पुन्हा इथे राहू द्या’, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करायचा. या त्रासाला वैतागून घेगडमल यांनी आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही संशयित तेथे उपस्थित होता.









