वाटेतच ब्रेक फेल झाल्याने ST ५० फूट खोल दरीत कोसळली, झाडाझुडपांत अडकली अन्…; अनेकजण जखमी.

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे.या भीषण अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शनिवारी दुपारी ४च्या सुमारास हा अपघात घडला आहे. बस झाडाझुडपांमध्ये अकडून पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळल्याचे वृत्त आहे. ही दरी किमान ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. ऐन घाटाच्या कठीण रस्त्यावर एसटीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस कोसळल्यानंतर गाडी झाडाझुडपांमध्ये अकडून पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या बचाव कार्य सुरु असून अनेकजण यात जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न रेस्क्यू टीम मार्फत सुरु आहेत.

महाड एसटी डेपोच्या बस क्रमांक एम एच २० बी एल ३८२२ ही बस रामदास पठार ते महाड या मार्गाने जात असताना वरंधा घाटात अपघात घडला. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यानेच हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात येते. या अपघातात जवळपास १८ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.एसटी महामंडळाच्या बसच्या अपघाताचे सत्र सुरु असल्याचे चित्र आहे. जुन्या एसटी अजूनही रस्त्यावर धावत असल्याने यामधून महामंडळाची अनास्था दिसून येते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामंडळ याची गंभीर दखल घेऊन काही पाऊल उचलेल का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.