महामार्गावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, कंटेनर थेट पुलावरुन कोसळला अन्…

 महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे.महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातचपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे आज सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट वीस ते पंचवीस फूट उंचीच्या पुलावरुन खाली कोसळला. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कंटनेरचेही प्रचंड नुकसान झाले.श्रवणकुमार भगवतीप्रसाद यादव (वय ३७, रा. मुंबई, मुळ उत्तरप्रदेश) असे चालकाचे नाव आहे.

भिगवण पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मदनवाडी चौफुला (ता.इंदापूर) येथे पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या कंटेनरचे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नंतर कंटेनर दुभाजकावर जोरात आदळला आणि दुसऱ्या लेनवरून थेट वीस ते पंचवीस फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला. सर्व रस्त्यावर वाहतूक अथवा नागरिक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.अपघातामध्ये कंटेनर चालक श्रवणकुमार यादव गंभीर जखमी झाला होता. त्यास येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

कंटेनर कोसळलेल्या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. अपघात सकाळच्या वेळी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.रायगडच्या भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. अपघातात बस सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात १८ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शनिवारी दुपारी ४च्या सुमारास हा अपघात घडला असून बस झाडाझुडपांमध्ये अकडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.