कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशांना सुटका, रावेर पोलिसांनी कारवाई रावेर १४/०३/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक सो. डॉ. विशाल जयस्वाल सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, मध्य प्रदेश सेमीलगत असलेल्या सोलाबर्डी गावातून कत्तल करण्याचा उद्देशाने महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने गोवंश जातीचे ४ बैल हे काठीने जोरजोरात मारत एकत्र मानेवर दोरीने घड्डू बांधून पळवून हाकलत घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याने नुसार मा. पोलीस निरीक्षक सो. रावेर यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील, पोहेको १५५९ जगदिश लिलाधर पाटील, पोहेकों/५८७हमीद हमजान तडवी, पोकों/१२४४ अतुल दिलीप गाडीलोहार,
पोका /२३३० संदिप हरीभाऊ पाटील यांचे पथकाने दोन पंचासह सावरपाट मंदिरापुढे थोड्या अंतरावर सोलाबडी कडुन येणा-या कच्चा चोरट्या जंगलातील रोडवर १६.३० वाजेचे सुमारास यातील आरोपी नामे शेख साबीर शेख मोती, वय २२ वर्ष, रा. रसलपुर ता. रावेर जि. जळगांव हा अंदाजे ८०,०००/- रुपये किमतीचे ४ गोवंश बैल हे काठीने जोरजोरात मारत एकत्र मानेवर दोरीने बांधून पळवून निर्दयतेने हाकलतांना तसेच त्यांना कुठल्याही प्रकारे चारा पाण्याची सोय न ठेवता क्रूरपणे भुकेल्या अवस्थेत कत्तल करण्याचे उद्देशाने घेचुन येत असतांना मिळुन आला
म्हणून फिर्यादी पोको १२४४ अतूल दिलीप गाडोलोहार यांचे फिर्याद वरुन शेख साबीर शेख मोती, वय २२ वर्ष, रा. रसलपुर ता. रावेर यांचे विरुध्द रावेर पोलीस स्टेशन CCTNS गुरनं. १२०/२०२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ). (ब), प्राण्याना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११ चे (१), (क), (घ), (घ), (ज), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/१५५९ जगदिश पाटील हे तपास करीत असून सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो.महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक सो.अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपुर भाग कृष्णकांत पिगळे, मा. पोलीस निरीक्षक सो. डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.









