इफ्तारसाठी घराकडे निघाले, पण भरधाव वेगाने घात केला; स्कॉर्पिओ ट्रकला धडकली अन् रमजानमध्ये कुटुंबावर आभाळ कोसळलं.

 नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीने एका पादचाऱ्याला उडवले आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी पलटी होऊन आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. यामध्ये दोघांनी जीव गमवावा लागला आहे.वृत्तानुसार, अर्धापूरहून नांदेडच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात होती. या गाडीत सहा जण होते. पिंपळगाव पाटी जवळ रस्ता ओलांडून जात असलेल्या एका व्यक्तीला स्कॉर्पिओने धडक दिली. त्यानंतर वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन डिव्हाईडरला ओलांडून विरुद्ध दिशेला गेला आणि नांदेडहून अर्धापूरकडे जाणाऱ्या ट्रकवर आदळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर गाडीमध्ये असलेले सहाही जण गाडीखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेने त्यांना तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.या अपघाताता सय्यद हुजैफ (वय ३२) आणि शेख सलाम (वय ३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघेही रहिवासी नांदेड शहरातील पाकीजा नगर येथील रहिवासी होते. तर शेख मस्तान शेख झैनुद्दीन (वय ३०, साई नगर, नांदेड), सय्यद एजाज सय्यद ग़ौस (वय २५), सय्यद फज़ल सय्यद ग़ौस (वय २७), नौमान खान हबीब खान (वय २०), शेख रिजवान शेख अलीम (वय २२), शंकर बोडके (पिंपळगाव, नांदेड) आदी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.दरम्यान अपघातग्रस्त मुस्लीम असून ते इफ्तारीसाठी नांदेडमध्ये आपल्या स्वगृही परतत होते. पण त्यांच्यावर वाटेतच काळाचा घाला पडला आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता, त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रमजान महिन्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयावर आभाळ कोसळले आहे. या मार्गावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहे. वेगाने वाहन चालवणाच्या नादात अपघाताला बळी पडत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.