नाशिक विभागात वर्षभरात ३१६ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक घटना, काय सांगते आकडेवारी.

नाशिक विभागात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या तेरा महिन्यांच्या कालावधीत ३१६ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या.नाशिक विभागात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या तेरा महिन्यांच्या कालावधीत ३१६ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यापैकी १८५ शेतकरी आत्महत्येच्या घटना एकट्या जळगाव जिल्ह्यात घडल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षात नाशिक विभागात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्याने या जिल्ह्यातील शेतकरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्तच आर्थिक अडचणीत सापडल्याचे स्पष्ट होत आहे.शासन आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला शासन आणि प्रशासन नेहमीच धावून जाते.

असे असूनही नाशिक विभागात शेतकरी आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे विभागातील शेतकऱ्यांपुढील विविध अडचणी अद्यापही कमी जास्त प्रमाणात कायम असल्याचे उघड झाले आहे.प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्याची गरज या समस्येमुळे अधोरेखित झाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या खालोखाल धुळे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांत देखील शेतकरी आत्महत्येच्या घटना जास्त प्रमाणात घडलेल्या आहेत.

नापिकी, आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा मातीमोल दर, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशा संकटांचा सामना विभागातील शेतकऱ्यांना करावा लागतो.नाशिक विभागात गेल्या तेरा महिन्यात ३१६ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यांपैकी जिल्हास्तरावरील समितीच्या चौकशीनंतर १२६ प्रकरणांतील प्रस्तावांना मंजुरी मिळून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय आर्थिक लाभ मिळाला. ७२ प्रस्ताव अपात्र ठरले असून, ११८ प्रस्ताव चौकशीच्या प्रक्रियेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.