बारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे. जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी बोरमळी (ता. चोपडा) येथे होळीपूर्व भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला. भोंग-यानिमित्त पोलिस पाटील बाबूराव पाडची यांच्या घरी सर्व मोरखी-बाबूज्या यांनी होळी देवतेला दंडवत घालून अन् 
विधीवत पूजा करुन गावात मिरवणूक काढण्यात आली. हा भोंगऱ्या चोपडा तालुक्यातील शेवटचा बाजार आहे. येथून परिसरातील होळी उत्सवाला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीत मोरखी-बाबूज्या यांच्यासह वेळी उपस्थित पोलिस पाटील पाडवी, कर्जाणेचे उपसरपंच प्रमोद बारेला,
देव्हारी सरपंच प्रल्हाद पाडवी, वैजापूरचे सरपंच दत्ता पावरा, मेलाणेचे सरपंच प्रताप पावरा, जिल्हा वनहक सदस्य पिंटू पावरा तसेच आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा इ मान्यवर सहभागी झाले होते.









