जागतिक ग्राहक दिन प्रबोधन कार्यक्रम भुसावळ तहसिल येथे संपन्न .

१५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक ग्राहक दिन (तापी सभागृह ) भुसावळ तहसिल येथे उत्साहात संपन्न झाला. तहसीलदार, भुसावळ नीता लबडे मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ जळगावचे सर्व साधक संघटक युवराज कुरकुरे होते. तसेच मंचावर रोशना रेवतकर,मिलिंद मांडाळकर, निलेश देशमुख, सुयोग चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे कडून प्रकाशीत झालेली उपयुक्त मार्गदर्शक असलेली यावर्षाची दिनदर्शीका प्रकाशन उद्घाघाटन रोशना रेवतकर मॅड्म यांचे हस्ते संपन्न झाले .

यावेळी पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर मॅडम यांनी ग्राहक हक्क व जबाबदारी याबाबत शासनाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. निलेश देशमुख यांनी प्लास्टिकच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज कुरकुरे यांनी “बदलत्या जीवनशैलीचे न्याय संक्रमण” या थीमवर मार्गदर्शन केले. त्यांनी रिसायकल आणि अपरिसायकल वस्तू, बायोडिग्रेडेबल साहित्य, इलेक्ट्रिक वाहने , सौर उर्जा आणि नैसर्गिक आहाराच्या महत्त्वावर भर दिला.प्रमुख पाहुणे मिलिंद मांडाळकर प्रवासी संघटना जिल्हा संघटक ,निलेश देशमुख ग्रा पं भुसावळ संघटक , सुयोग चौधरी सहसंघटक पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर , पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे सह कार्यक्रमास वितरण व्यवस्था संघटनेचे पदाधिकारी, पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रबद्ध सुत्रसंचालन कार्यालयातील दिपक बाविस्कर यांनी केले . ग्राहक विक्रेते, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक याच्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला बदलत्या जीवन शैलीचे न्याय संक्रमण हा विचार घेवून सर्वांनी प्रबोधनाचे ग्राहक जागृतीचे कार्य करण्याचा संकल्प केला . नाशिक विभागीय संघटक ग्रा.पं. संजय शुक्ल तसेच जिल्हा अध्यक्ष गुरुबक्ष जगवाणी यांनी कार्यक्रमाचे अभिनंदन केले आहे .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.