पाटलांचा पाय खोलात; चौकशी समितीकडून नाशिकच्या ‘त्या’ ५२ शिक्षकांच्या फायलींची मागणी.

​​अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समितीने बी. टी. पाटील यांना पत्र लिहून शिक्षण समायोजन प्रकरणातील सर्व फायली चौकशी समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हा परिषद तसेच इतर आस्थापनांमधील ५२ शिक्षकांना महापालिकेच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन करून त्यांना बढती दिल्या प्रकरणात महापालिकेच्या चौकशी समितीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समितीने बी. टी. पाटील यांना पत्र लिहून शिक्षण समायोजन प्रकरणातील सर्व फायली चौकशी समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षण विभागाकडे समायोजनासाठी आलेले सर्व अर्ज, यासंदर्भात निवड केलेल्या शिक्षकांची माहिती आणि राबविलेल्या प्रक्रियेबाबतचा सर्व तपशील समितीने मागवला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील फायलींचा शोध सुरू झाला आहे.महापालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पाटील यांनी जिल्हा परिषद व इतर आस्थापनांवरून ५२ प्राथमिक शिक्षकांना महापालिकेमध्ये एकतर्फी सामावून घेतले.

मात्र, सामावून घेत असताना बिंदूनामावली व रिक्त पदांचा कोणताही विचार केला नाही. ३९ जागा रिक्त असताना सरळसेवा भरतीने अथवा अनुसूचित जाती संवर्गातील आंतरजिल्हा भरणे आवश्यक होते. परंतु, या चुकीच्या पद्धतीने ५२ शिक्षकांना सामावून घेत त्यांना बढती देण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी इतर संवर्गातील शिक्षकांना बदलीने घेतल्याची लक्षवेधी आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत मांडली होती. त्यानंतर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणात पाटील यांची बदली करण्यासह चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री सामंत यांनी बी. टी. पाटील यांची तत्काळ बदली करण्याचे, तसेच या प्रकरणाची पंधरा दिवसांत अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवालावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिकेत तत्काळ अतिरिक्त आयुक्त चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करीत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. चौकशी समितीने गुरुवारी (दि. १३) बैठक घेत पाटील यांना यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य लेखा परिक्षक बळवंत गायकवाड, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर व मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट यांनी महापालिकेबाहेरील ५२ शिक्षकांच्या फायली शिक्षण विभागाकडून मागवल्या आहेत. शिक्षण विभागाकडे समायोजनासाठी आलेले सर्व अर्ज, यासंदर्भात निवड केलेल्या शिक्षकांची माहिती आणि राबविलेल्या प्रक्रियेबाबतचा सर्व तपशील समितीने मागवला आहे. पाटील यांच्या कारभारात आयुक्तांकडे येत असलेल्या अर्जाच्या आधारे शिक्षकांचेही म्हणणे चौकशी समिती ऐकून घेणार आहे. त्यामुळे पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.