भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी वाढत आहे. वन विभागानं त्याच्या घरावर कारवाई केली. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन खोक्यानं घर उभारलं होतं.बीड: भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी वाढत आहे. वन विभागानं त्याच्या घरावर कारवाई केली. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन खोक्यानं घर उभारलं होतं. ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केलं. बुलडोझर लावून ही तोडक कारवाई करण्यात आली. भोसलेला ३ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली. मारहाण प्रकरणात तो तुरुंगात आहे.बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील बावी गावात आज पोलिसांचं पथक पोहोचलं. याच गावात खोक्यानं ढाकणे पितापुत्राला अमानुषपणे मारहाण केली होती. त्याच प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. आता याच गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी पोलीस खोक्याला घेऊन बावी गावात घेऊन गेले. तिथे पोलिसांनी क्राईम सीन रिक्रिएट केला.










