एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले.

वर्ध्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच निधन झाले आहे. दोन वर्षापासून निधीसाठी उंबरठे झिजवत होते मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता.केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असलेली पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) आहे. या योजनेचा निधी देशभरातली असंख्य लोकांना निधी मिळत असला तरीही काही जण या निधीपासून वंचित राहिले आहेत. काहींना सुरूवातीचे काही हप्ते आले मात्र त्यानंतर निधी बंद झाला. असाच प्रकार वर्ध्यातील (Wardha) एका वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत झाला. सुरुवातीला काही हप्ते आल्यानंतर योजनेचा निधी मिळाला नाही. यासाठी त्यांना सरकारी कार्यालयाचे अनेकदा खेटे घालावे लागले मात्र निधी प्राप्त झाला नाही आणि अखेर निधीच्या प्रतिक्षेतच त्यांचा मृत्यू झाला. बाबूलाल आत्राम (वय ९४) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे.

बाबूराव आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्यांनी किसान सन्मान निधीचे हप्ते मिळावे यासाठी गेली दोन वर्ष तहसील कार्यालय, कृषी कार्यालय अशा सरकारी कार्यालयात सन्मान निधी मिळावा याकरिता निवेदन, तक्रार केली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. काही ना काही कारणं समोर ठेवत त्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवण्यात आले. स्थानिक आमदार दादाराव केचे यांनीही त्यांच्यासाठी प्रयत्न केले. केचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता मात्र तरीही मार्ग निघाला नाही. अखेर किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच आत्राम यांचे निधन झाले.बाबूराव आत्राम यांच्या नातवाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाबूराव सीताराम आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते. १२ व्या हप्त्यापासून त्यांचा निधी मिळत नव्हता. तहसिह कार्यालय, कृषी विभाग प्रत्येक कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालय राज्याच्या मंत्रीपर्यंत हा प्रश्न घेऊन गेलो. तरी त्यावर काही तोडगा निघाला नाही.आतापर्यंत किसान सन्मान निधीचा १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हा निधी मिळत नाही यासंबंधी अनेक कारणे असू शकतात. ज्यात ई केवायसी नसणे, अर्ज करताना शेतकऱ्याने केलेली चूक, शेतजमीनीची पडताळणी झाली नसणे इत्यादी बाबी. मात्र अनेक शेतकऱ्यांना निधी खात्यात जमा होत असताना अचानक बंद झाला असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्याबद्दल त्यांनी आत्राम यांच्याप्रमाणेच अनेक कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही समस्याचे निवारण होत नाहीत. त्याकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.