औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला; SRPFची तुकडी, २ अधिकारी तैनात; कसून तपासणी, काय घडतंय?

औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करु लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला आहे. यानंतर आता कबर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर: औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करु लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला आहे. यानंतर आता कबर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलानं शिवजयंतीला हाती घेतील आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे.छत्रपती संभाजीनगरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळील बंदोबस्त अचानक वाढवण्यात आलेली आहे. या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. १५ कर्मचारी, २ पोलीस अधिकारी कबर परिसरात आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. २ ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. कबर पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. मगच त्यांना आत सोडलं जात आहे.

छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला. गेल्या काही दिवसांत यावरुन अनेक नेत्यांनी विधानं केली आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागात एसआरपीएफची १ तुकडी, १५ पोलीस, २ अधिकारी तैनात केले गेले आहेत. काही पोलीस साध्या वेशातही तैनात आहेत. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बरीच खबरदारी घेण्यात आली आहे.औरंगजेबाची कबर इथे नको. कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे?, असे प्रश्न शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी विचारले. ‘एक राजा तिकडून येतो काय, इथल्या हिंदूंची मंदिरं पाडतो काय, महिलांवर अत्याचार करतो काय, अनेक लोकांना छळतो काय, संभाजी महाराजांचे डोळे काढले गरम सळया टाकून, नखं काढली. ४० दिवस त्यांना हाल हाल करुन मारलं. त्याची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे तो औरंगजेब इथे तुम्हाला?’, असे सवाल त्यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काहीशी वेगळी भूमिका मांडली. ‘औरंगजेबसारखी एक बलाढ्य शक्ती होती. त्याच्याकडे प्रचंड पैसा, मनुष्यबळ, हत्ती-घोडे होते. इतकी मोठी ताकद असलेल्या माणसालासुद्धा या महाराष्ट्रात २७ वर्षे राहावं लागलं आणि तरीही त्याला राज्य करता आलं नाही. त्याचं प्रतीक औरंगजेबाची कबर आहे. त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्याबाबतीत चर्चा झाली नाही, तर इतिहासात कुठे काहीतरी गडबड लोक उद्या जाऊन करु शकतात. त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणं अधिक योग्य ठरु शकतं,’ असं रोहित पवार म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.