होळीच्या रंगाचा बेरंग; धुळवड खेळताना मुंबईत २९ जखमी, चार जणांना गंभीर दुखापत.

प्रत्येक वर्षी धुळवडीवेळी रंग खेळताना पाय घसरून पडणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून घसरल्याने अपघात होणे, क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याचे प्रकार यंदाही घडले. मुंबईमध्ये धुळवडीचा आनंद लुटत असताना काही भागांमध्ये मात्र रंगाचा बेरंग झाला. या उत्साहादरम्यान प्रमुख रुग्णालयांमध्ये २९ जणांना उपचार घ्यावे लागले. त्यात चार जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करावे लागल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्रत्येक वर्षी धुळवडीवेळी रंग खेळताना पाय घसरून पडणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून घसरल्याने अपघात होणे, क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याचे प्रकार यंदाही घडले.

यातून जखमी झालेल्यांपैकी काही जणांना प्राथमिक उपचार देण्यात आले. लो. टिळक रुग्णालयामध्ये १० जखमी आले होते. त्यापैकी दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाला हाड मोडल्यामुळे उपचार द्यावे लागले, तर दुसऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.नायर रुग्णालयातही दोन रुग्ण दाखल झाले. एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसऱ्याला भांडणातून डोक्याला गंभीर मार लागला. केईएम रुग्णालयात सातजण उपचारासाठी आले. मात्र सर्वांना किरकोळ जखमा असल्याने तिथेच प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयामध्येही १० प्रकरणांची नोंद झाली.

मात्र कुणालाही दाखल करण्याची गरज लागली नाही. या दुर्घटनांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. धुळवड खेळताना फेकलेला पाण्याचा फुगा लागल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याला गंभीर जखमी केले. डोंबिवलीतील सागाव परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. हर्ष जाधव (१७) असे जखमी तरुणाचे नाव असून, याप्रकरणी प्रणय जाधव या हल्लेखोराविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.