मनमाडला कांद्याच्या शेडला भीषण आग; शेडसह शेकडो क्विंटल कांद्याचा कोळसा, तीन लाखांची रोकड खाक.

या घटनेत सहा लाख रुपयांचा कांदामाल जळून खाक झाला, तर आडत कंपनीचे कार्यालयही आगीच्या कक्षेत सापडून कपाटात ठेवलेली जवळपास पावणे तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले. मनमाड-चांदवड रस्त्यावर असलेल्या कांदा खरेदी-विक्री करणाऱ्या आडत कंपनीच्या खळ्यावरील शेड आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.गुरुवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सहा लाख रुपयांचा कांदामाल जळून खाक झाला, तर आडत कंपनीचे कार्यालयही आगीच्या कक्षेत सापडून कपाटात ठेवलेली जवळपास पावणे तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, अग्नीशमन दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे. कांदा व्यापारी व आडत कंपनीचे मालक शब्बीर शेख यांच्या मनमाड-चांदवड मार्गावरील केजीएन या कांद्याच्या खळ्यातील शेडला गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आग लागून शेडसह सहा लाख रुपयांचा कांदा आगीत जळून खाक झाला. आगीचे लोट कंपनीच्या कार्यालयात पोहचून कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेतून आणलेली व कपाटात ठेवलेली साधारण पावणे तीन लाख रुपयांची रक्कम, लॅपटॉप व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

त्याचबरोबर या घटनेत तीन लाख रुपयांचे बारदानही जळाले.अग्नीशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याची शर्थ केली. त्यानंतर अर्ध्या तासाने आग आटोक्यात आली. कांदा व्यापारी शब्बीर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय करे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट झाले नसून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.