पाणीसाठा खालावला! मुंबईसाठीच्या सात धरणांत ४२ टक्के पाणी, कोणत्या धरणात किती पाणी.

सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.पावसाळ्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. त्यांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारीत असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो.

हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर धरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर आहे. आता यामध्ये २२ टक्के म्हणजेच २९ हजार २०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. तानसा धरणाची साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ८० दशलक्ष लिटर आहे. यामध्ये सध्या ५० हजार ६२९ दशलक्ष लिटर म्हणजेच ३४ टक्के पाणी आहे.मध्य वैतरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर असून यामध्ये आता ४६ टक्के, तर भातसा धरणाची साठवण क्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर असून सध्याच्या घडीला यामध्ये ४२ टक्केच पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या धरणांत ५० ते ५५ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या पाणी कपातीचा कोणताही निर्णय नसला, तरीही एप्रिलनंतर पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.उन्हाचा ताप हळूहळू वाढू लागला आहे. मार्चनंतर पाण्याची गरज अधिक वाढते. गेल्या वर्षी याच तारखेला ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर सन २०२३मध्ये ४३ टक्के साठा होता. त्यामुळे झपाट्याने कमी होणारे पाणी पाहता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज आहे. याच कालावधीत सन २०२३च्या तुलनेत २०२४मध्ये पाणीसाठा कमी झाल्याने ५ जून २०२४पासून १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. त्या आधी ३० मे २०२४पासून पाच टक्के पाणीकपात लागू होती.उन्हाचा पारा चढत असताना राज्यातील विजेची मागणीही उच्चांकाकडे जात आहे. गुरुवारी होळी दहनाच्या दिवशी ३० हजार ८५० मेगावॉट विजेची मागणी नोंदवण्यात आली. ही मागणी सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. महावितरणने आपल्या ग्राहकांना २७ हजार १२६ मेगावॉट इतक्या विक्रमी विजेचे विनाअडथळा वहन केले. महावितरणच्या ग्राहकांची वीजमागणी गुरुवारी दुपारी ३.५० वाजता २७ हजार १२६ मेगावॉटवर गेली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.