मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले. पोलिस आता याप्रकरणात तपास करत आहेत.एक अतिशय धक्कादाक माहिती पुढे येताना दिसतंय. मुंबईच्या बोरिवली इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला आग लागली. हैराण करणारे म्हणजे ही आग जंगलामध्ये तळीरामांनी लावली. दारूच्या नशेत त्यांनी चक्क जंगलात आग लावली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. होळी म्हटले की, तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. होळी असल्याने मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलाजवळा असलेला दहिसर परिसरात गेले होते. तिथे त्यांच्या पार्ट्या सुरू होत्या.










