धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न !

धरणगाव येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. तत्पूर्वी भ.गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी पूज्य भदंत अमर ज्योती, भैय्यासाहेब सोनवणे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी तर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक प्रा.डॉ.भरत शिरसाठ व चिंतामण जाधव यांचा माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे यांच्या हस्ते ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक आप्पासाहेब भरत शिरसाठ यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन करून एक दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. येत्या रविवारी १६ मार्च, २०२५ रोजी ” संविधान नगरी कृष्णा हॉटेल मैदान ” एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद संपन्न होत असल्याने शहर परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रिडा क्षेत्रातील तसेच सर्व संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे मुख्य संयोजक प्रा.भरत शिरसाठ यांनी केले आहे. याप्रसंगी उषाताई बाविस्कर, बबिताताई बागुल, बेबीताई गायकवाड, सविता गाढे, अजय सोनवणे, विक्रम वाघमारे, संतोष सोनवणे, मयूर भामरे, उदय मोरे, बबलू शिरसाठ, चंदू सोनवणे, अशोक मोरे, किरण सोनवणे, संकेत शिरसाठ, विजय गायकवाड, भुंडा पहिलवान, विवेक बाविस्कर, संविधान सन्मान परिषदेचे संयोजक सुधाकर मोरे, कैलास पवार, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी, प्रा.आकाश बिवाल, बी डी शिरसाठ, गोरख देशमुख, निलेश पवार, सुरज वाघरे, ॲड.रविंद्र गजरे, प्रदिप बाविस्कर, दिपक विजय वाघमारे, विजय सोनवणे, महेंद्र तायडे, उदय मोरे, आबासाहेब राजेंद्र वाघ तसेच सर्व संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र बागुल यांनी तर आभार राजेश बोरसे यांनी मानले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.